१) संत तुकाराम महाराज मूळ नाव: - तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे).
२) जन्म: - माघ शुद्ध ५, वसंत पंचमी, शके १५२८, २२ जानेवारी १६०८.
३) सदेह वैकुंठ गमन: - फाल्गुन कृष्ण २, शके १५७०, १ ९ मार्च १६५०, दुपारी १२:०२ वाजता (या दिवसाला संप्रदायामध्ये तुकाराम बीज असे म्हणतात).
४) संप्रदाय: - वारकरी.
५) गुरु: - बाबाजी चैतन्य.
६) घराण्यातील मूळ महापुरुष (विठ्ठलभक्त): - विश्वंभर बुवा.
७) वडील: - बोल्होबा अंबिले.
८) आई: - कनकाई बोल्होबा अंबिले.
९) पत्नी: - जिजाबाई (आवली).
१०) भाऊ: - सावजी (विदेही) (मोठा), कान्होबा (लहान).
११) आपत्य: - महादेव, विठोबा, नारायण, भागीरथीबाई, काशी.
१२) घराण्याची परंपरा: - पंढरपूरची वारी.
१३) तुकाराम महाराजांची काव्यरचना: - संत तुकाराम गाथा (अभंग पाच हजारावर, पाचवा वेद), भगवद्गीतेवर अभंग रुपी भाष्य (अभंग ७००).
१४) व्यवसाय: - (घराणे मूळ: श्रीमंत होते.) शेती, वाणी, सावकारकी. नंतर सर्वच गोष्टींचा त्याग केला.
१५) कार्य: - अज्ञानी लोकांमध्ये ज्ञानाचा प्रकाश पाडणे दांमभिका विरोधात योग्य प्रकारे प्रतिउत्तर करणे.
१६) सासरे: - आप्पाजी गुळवे, पुणे.
१७) मान्य असणारा देव: - पांडुरंग, विठोबा.
१८) ध्यान साधना भजन करण्याचे ठिकाण: - भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोराडा डोंगर
१ ९) महाराजांचे अभंग लिहिण्याचे काम: - संताजी जगनाडे (तेली).
२०) शिष्य: - संत निळोबाराय, संत बहिणाबाई.
संत तुकाराम महाराज हे अतिशय प्रेमळ पण दांभिकां विषय अतिशय कठोर व निर्भिड कवी होते. त्यांनी वेद अभंगाच्या रूपातून सामान्य लोकांपर्यंत पोहचविला. त्यांचे अभंग इतके लोकांना आवडू लागले की अभंग म्हंटल्यावर फक्त तुकाराम महाराज लोकांना दिसू लागले. संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराज तर कळस संत तुकाराम महाराज यांना मानले जाते. आजही तुकाराम महाराजांच्या अभंगावर अनेक अभ्यासू, वैज्ञानिक, साहित्यिक, सांप्रदायिक, विशेष म्हणजे बाहेरील देशातीलही लोक अभ्यास करतात. तुकाराम महाराजांनी आपल्या अनेक अभंगांमधून विज्ञानही प्रकट केले आहे तसेच त्यांनी अंधश्रद्धा देखील दूर केली आहे. तुकाराम महाराजांनी प्रथमच कर्जमुक्ती केली ती म्हणजे अशी त्यांचा परंपरागत व्यवसाय सावकारकी होता. दुष्काळ पडला व त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात टाकून सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनींकडे आलेल्या धरणे करीला तुकाराम महाराजांकडे अनुग्रह घेण्यासाठी पाठवले अशी तर तुकाराम महाराजांची थोरवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना घोडे, अबदागिरी, मौल्यवान सोने, रत्न पाठवले तरी देखील त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. खरोखर तुकाराम महाराज म्हणजे वैराग्यमूर्ती आहेत.
अशा थोर व्यक्तिमत्व असलेल्या तुकाराम महाराजांच्या अभंगांचा सर्वांनी अभ्यास करावा हीच विनंती.
एकेकाळचा कट्टर वैरी रामेश्वर भट्ट यांनी देखील तुकाराम महाराजांविषयी उद्गार काढले
तुकाराम तुकाराम। नाम घेता कापे यम ।।
धन्य तुकोबा समर्थ। जेणे केला हा पुरुषार्थ ।।
म्हणे रामेश्वरभट्ट द्विजा। तुका विष्णू नाही दुजा ।।