श्री पंत महाराज बाळेकुंद्री विरचित "श्री दत्त प्रेमलहरी" ही भजनगाथा अॅप्लिकेशन रुपात प्रकाशित केल्यानंतर, पंत वाङमय जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचावे ह्या हेतूने ह्या कार्यात पुढचे पाऊल म्हणून श्री पंत बोधपीठ आणि श्री नरसिंह पंत वाङमय प्रकाशन मंडळ ह्यांनी “श्री पंतगुरु चरित्र पोथी” हा प्रासादिक व अमोल ग्रंथ अॅप्लिकेशन रुपात प्रकाशित करण्यास श्री पंत क्रिएशंसना प्रवृत् केले त्याबद्दल आम्ही श्री पंत बोधपीठ आणि श्री नरसिंह पंत वाङमय प्रकाशन मंडळ ह्यांचे आभारी आहोत आणि आपण आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरवण्यास सतत प्रयत्नशील राहू.
श्री वामन नरहर कामात कृतं श्री पंतगुरु चरित्र पोथीमधील सर्व अध्याय ह्या अॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट करण्यात आले असून, हे कार्य सिद्धीस नेण्यास ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही आभार मानू इच्छितो.
सर्व गुरुबंधुंना एक कळकळीची विनंती कि, हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर कृपया आपला अभिप्राय आणि विचार आम्हांस जरूर कळवावेत, त्यासाठी ह्या अॅप्लिकेशनच्या प्रकाशकाशी संपर्क साधावा जेणेकरून हे अॅप्लिकेशन अजून चांगल्या पद्धतीने आपल्या गुरुबंधुंसाठी उपलब्ध करीता येईल, त्यासाठी तुम्ही "shreepantcreations@gmail.com" ह्या इमेल वर संपर्क करू शकता.
श्री पंत समर्थ ... श्री गुरुदेव दत्त ... !!!
- श्री पंत क्रिएशंस
श्री पंतगुरु चरित्र पोथी