आपल्यापैकी प्रत्येकच जण कुठे ना कुठे तरी पिकनिक / ट्रेक किंवा ववि ला जायचा प्लॅन आखत असणार - कदाचित माबो च्या टोळक्यासोबत किंवा स्वतंत्र ग्रुप सोबत किंवा मग घरच्यांसोबत.
बर्याचदा असं होतं की जाण्याचं तर ठरतं पण नक्की कुठे जायचं हे शोधण्यापासून पूर्वतयारी सुरु होते. मग नेट वर शोधा, मित्रांना हाकाट्या द्या, माहिती मिळवा, चौकश्या करा या चक्रातून जावे लागते. तर या त्रासापासून वाचण्यासाठी या अँप चा तुम्ही उपयोग करू शकता.
- कोकण
- पश्चिम महाराष्ट्र
- मराठवाडा
- विदर्भ
- खान्देश
- गोवा
- अष्टविनायक दर्शन
- अकरा मारुती
- पर्यटनसाठी माहिती
- कृषी पर्यटन
या अँप मध्ये विभागानुसार प्रेक्षणीय स्थळे दर्शवली आहेत. जेणेकरून तुम्हाला योग्य प्रकारे नियोजन आखता येईल. हे अँप तुम्ही ऑफलाईन वापरू शकता.