गूढ, विस्मयकारी आणि अनाकलनीय अशा गोष्टीपण या जगात असतात का?
नाथा! गोरापान, सहाफूट उंच, उघडाबंब, फक्त जानवे आणि कंबरेला निळी हाफ पँट, वर तुळतुळीत टक्कल. तो त्या आडाजवळ का घुटमळायचा?
आडात म्हणे खजिना होता, पण म्हणूनच नाथा अघोरी व्रत करीत असावा का? त्याला पिशाच्च वश झाले का?
"वाशपिशाच्च" !! तात्या बलसोडेंनी नाकात तपकीर ठोसत निर्णय दिला, आणि सोनारकाकांच्या दुकानात खळबळ उडाली. पिंका टाकल्या गेल्या, तंबाखू नव्याने मळला गेला.
चित्तथरारक, उत्कंठावर्धक, वैशिष्ठपूर्ण आणि थोड्याशा मिश्किल अशा प्रवाही लेखनशैली मधील कथा एक वेगळाच वाचनानंद मिळवून देतात.
सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक