मराठी भावसंगीताच्या कार्यक्रमात बहुतांशी कार्यक्रम वाद्यवृंद या
स्वरुपातच असतात. पूर्वापार गाजलेली गाणीच यातून सादर केली जातात.या
परंपरागत कार्यक्रमापेक्षा, अगदी जाणीवपूर्वक काही नवीन प्रकल्प तयार
करून, त्यातून काही अगदी नवीन रचना सादर करण्याच्या हेतूने, शब्दवेधची
स्थापना 1988 मध्ये झाली. प्रायोगिक रंगभूमीवरील गायक - अभिनेते चंद्रकांत
काळे यांनी ही संस्था स्थापन केली. अमृतगाथा या लोक-संगीतावर आधारित
संत-रचनांच्या कार्यक्रमाने संस्थेची वाटचाल सुरु झाली. या वर्षी ऑगस्ट
मध्ये संस्था 30 व्या वर्षात प्रवेश करीत आहे.स्व.आनंद मोडक यांनी
संस्थेच्या संगीत-दिग्दर्शनाची जबाबदारी अखेरपर्यंत पार पाडली याचा
संस्थेला सार्थ अभिमान आहे.त्यांना मनःपूर्वक आदरांजली. तसेच माधुरी
पुरंदरे, मुकुंद फणसाळकर, प्राची दुबळे, सुबोध भावे, शर्वरी जमेनीस, समीर
दुबळे, गिरीश कुलकर्णी, विभावरी देशपांडे, अशा नामवन्तानी केलेली मदत फार
मोलाची आहे. अशोक गायकवाड, राजीव परांजपे, अपूर्व द्रविड, आदित्य मोघे, संजय
पंडित, गोविंद भिलारे या कुशल वादकांचा सहभाग असाच अनमोल. आतापर्यंत
निर्माण झालेल्या 8 कार्यक्रमांचे सुमारे 400 च्या आसपास प्रयोग आम्ही
सादर करू शकलो ते रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे. या नवीन माध्यमातून
रसिकांसमोर जातानाही असाच प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे.
+In App Purchase
+Pull to refresh
+UI Changes