संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेला आणि तत्कालीन गटशिक्षणाधिकारी व माजी शिक्षण सहाय्यक संचालक मा.श्री.संपत गायकवाड साहेब यांनी सुरु केलेला भुदरगड शिक्षण विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजेच भुदरगड टॅलेंट सर्च (BTS). या भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षेची पायाभूत तयारी आनंददायी व ज्ञानरचनावादी पद्धतीने करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत प्रज्ञाशोध परीक्षेचं मोबाईल अॅप. गुरुमाउली प्रस्तुत या अॅपमध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी जवळपास ३००० प्रश्नांचा समावेश आहे. या अॅपमध्ये इयत्ता पहिली व दुसरीचे भाषा, गणित आणि इंग्रजी विषयातील सर्व घटकांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रश्नरचना केलेली आहे. भाषा, गणित आणि इंग्रजी विषयातील पाठ्यपुस्तकातील भरपूर चित्रांचा समावेश केला असल्याने मुले हे सर्व प्रश्न आनंदाने सोडवतील. प्रत्येक घटकांवर किती प्रश्नसंख्या समाविष्ट आहे, त्याचबरोबर सर्व प्रश्न सोडवल्यावर शेकडा गुण किती मिळाले, याचा अचूक निकाल लगेच मिळतो. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी प्रस्तुत अॅप नक्कीच उपयोगी पडेल याची आम्हाला खात्री आहे.
Bugs fixing
Useful for first to forth standard.
Suitable for the preparation of the competition.
Based On Bhudargad Talent Search Pattern.(BTS)