हे अप्लिकेशन महाराष्ट्र शासनाच्या मराठी माध्यम च्या इयत्ता तिसरी साठी विकसित केले आहे.सदर अप्लिकेशन मध्ये सर्व संबोध स्पष्टीकरण सहित स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.हे अप्लिकेशन दिनांक 1 जानेवारी 2017 रोजी उपलब्ध झाले आहे, पण त्याचे सर्व टेस्टिंग व दर्जा यासाठी नंतर ते प्ले स्टोअर वर उपलब्ध होण्यास आजचा दिनांक 12 रोजी शक्य झाले आहे. E-School चे सर्व अप्लिकेशन हे दर्जा व गुणवत्तेसाठी अपडेट केले जातात.त्यामुळे सदर अप्लिकेशन मध्ये वेळोवेळी करावयाचे बदल व त्यासंदर्भातील सूचना आम्हाला आपणाकडून अपेक्षित आहेत.सध्या इयत्ता तिसरी चे संदर्भ साहित्य उपलब्धतेनुसार आम्ही येथे प्रसारित केले आहे.
या अप्लिकेशन मध्ये आपणास काय मिळेल?
आपण जर तिसरी या इयत्ते ची PDF पुस्तके जर वापरत असाल तर त्याची साईझ सर्व मिळून 62,8 MB पर्यंत जाते.पण हे सर्वच येथे PDF स्वरुपात न देता सर्व भाग टाईप करून येथे दिला आहे.त्यामुळे हि सर्व पुस्तके येथे 21 MB पर्यंत शक्य झाली. शिवाय फक्त पुस्तके नव्हे तर तुम्हाला पुस्तकातील चित्रा व्यतिरिक्त जी चित्रे पाठ्य पुस्तकाशी संदर्भित आहेत ती चित्रे आणि त्यासंदर्भातील व्हिडिओ या अप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहेत.त्यामुळे तुम्ही जर एखादा संदर्भ विद्यार्थ्यांना समजावून सांगणार असाल तर त्याचे व्हिडिओ / चित्रे शोधणेची आता गरज नाही तर ते सर्व व्हिडिओ / चित्रे तुम्हाला त्या शब्दावर क्लिक केलेबरोबर मिळून जातील.
या अप्लिकेशन साठी अनेक शिक्षकांनी आपले योगदान दिले आहे.त्यांची नावे तुम्हाला अप्लिकेशन मध्ये किंवा आमच्या वेबसाईट वर पहावयास मिळतील.
याच्प्रकाराचे आणखी इतर अप्लिकेशन तुम्हाला इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत थोड्याच अवधीत मिळतील.त्यासाठी आमच्या या प्ले स्टोअर वर भेट देत रहा.